चिंदर विकास कामांबाबत उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांना दिले निवेदन..!
चिंदर/ विवेक परब :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 30 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी http://localhost/news/public/uploads/2014 ते http://localhost/news/public/uploads/2019 या पाच वर्षाचा कालावधी धरून 8वर्षे पूर्ण झाली.
मोदी सरकारची कामगिरी जनते पर्यंत पोहचवण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये मोदी सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून मते जाणून घेतली जात आहेत.
यासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री तसेच खासदार यांना आपला मतदारसंघ सोडून दुसर्यां राज्यातील एक लोकसभा मतदार संघात जाऊन कार्यक्रम घेण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे . या आवाहनाला साथ देत केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपादभाऊ नाईक आज हडी ग्रामपंचायत येथे आले होते.
चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली चिंदर विकास कामानबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना नाईक यांनी आपण चिंदर विकास कामांना गती देण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, उद्योजक प्रकाश मेस्री, चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)