श्री बांदेश्वराची ' मिरगाची पालखी ' उत्साहात..!
बांदा |राकेश परब :
बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराच्या मिरगाच्या पालखीचा सोहऴा बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.या पालखीसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंपरेनुसार दरवर्षी श्री बांदेश्वर भुमिका जत्रोत्सवापासून पालखी सोहळा आरंभ होतो . त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा होतो. यातील शेवटचा पालखी सोहळा म्हणजे मृग नक्षत्राला होणारी मिरगाची पालखी असते. बुधवार दि.८ जून रोजी हा सोहळा झाला. तसेच मृगानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यजमान विवेक विरनोडकर यांनी सपत्नीक पुजन केले.रात्री सवाद्य गायन करत विविध पदे,अभंग गात पालखी सोहळा झाला. त्यानंतर मंदिरात महाआरती झाली. सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालून तीर्थप्रसाद वाटण्यात आला.
परंपरेप्रमाणे येत्या सोमवारपासून ते जत्रोत्सवापर्यंत पालखी सोहऴा होणार नाही.त्याऐवजी दर सोमवारी 8 ते 9 या वेळेत भजनसेवा होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)