<em>आकांक्षांपुढती जेथे गगन ठेंगणे..!!</em>
दिव्यांग विद्यार्थीनी जान्हवी पाताडे हीचे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश..!!
मालवण | प्रतिनिधी :
कु. जान्हवी प्रदीप पाताडे ही विद्यार्थीनी इयत्ता बारावी कला शाखेत वराडकर हायस्कुल ज्युनिअर कॉलेज कट्टा येथे शिक्षण घेत होती.
सन http://localhost/news/public/uploads/2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीमध्ये ती पहिल्या वर्गात यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली आहे.
ही मुलगी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असल्याने तिला सुकळवाड ते कट्टा हा कॉलेजपर्यंतचा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. तरी त्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीरीत्या यश प्राप्त केले. तिच्या या शैक्षणिक संघर्षमय यशाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
साक्षी अनिल काळसेकर ही देखील यशस्वीरित्या पास झाली.
त्या निमित्त मैंत्री ग्रुप सुकळवाड/गावराई यांच्यावतीने विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)