ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
नट वाचनालय ग्रंथालयाच्या वतीने लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिन साजरा...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नट वाचनालय ग्रंथालयाच्या वतीने लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिन साजरा...!

प्रकाशन: 10 Jun 2022 09:48 AM
वाचन संख्या 25

बांदा | राकेश परब :
येथील नट वाचनालय ग्रंथालयाच्यावतीने लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिन वाचनालयात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डिंगणे येथील एकनाथ सावंत हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, महिला सदस्या स्वप्निता सावंत उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी एकनाथ सावंत तसेच प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, सुभाष मोर्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचा राज्याभिषेक सोहळा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकांच्या मांडलेल्या प्रदर्शनाचा सर्व वाचक व सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोर्ये यांनी यावेळी केले. यावेळी अंकुश माजगांवकर, रामचंद्र पेंडसे, विट्ठल रेळेकर, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर -नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स