आचरा येथील सौ.विभूति पुजारे यांचे निधन...!
चिंदर |विवेक परब :
आचरा गुरुकुल सोसायटी सीमांबा येथील रहिवासी सौ.विभूति चंद्रकांत पुजारे वय (५९) वर्षी यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा पश्चात पती, दीर, भावजय, पुतणे, पुतणी असा त्यांचा परिवार आहे. त्या नेहमी हसतमुख व मनमिळाऊ होत्या तसेच त्यांचा खूप मोठा मित्र परिवार आहे . त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त्त होत आहे.
आचरा हायस्कूलचे माजी लिपिक चंद्रकांत जगन्नाथ पुजारे यांच्या त्या पत्नी होतं.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)