ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
सावंतवाडी भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडी बांदा मंडल अध्यक्षपदी विजय जंगले तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सावंतवाडी भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडी बांदा मंडल अध्यक्षपदी विजय जंगले तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड...!

प्रकाशन: 09 Jun 2022 05:33 PM
वाचन संख्या 57

नगराध्यक्ष संजू परबांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करत भाजप भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर..!

सावंतवाडी | प्रतिनिधी : भाजपाच्या भटके-विमुक्त आघाडीच्या सावंतवाडी तालुका बांदा मंडल विजय जंगले यांची निवड करण्यात आली आहे. तर आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ही निवड आमदार नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते प्रदान करत भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर.


याप्रसंगी बोलताना श्री.जंगले म्हणाले भाजपा वाढीच्या दृष्टीने आम्ही तालुक्यात प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी सावंतवाडी तालुका दौऱ्यावर असताना या निवडी जाहीर केल्या.भाजप भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरता काळे जिल्हा दौरा करीत आहेत. भविष्यात जिल्ह्यात भाजपा मोठी ताकद निर्माण करून देणार असा विश्वास जिल्हा अध्यक्ष काळे यांनी व्यक्त केला.लागेल ते सहकार्य आमच्याकडून मिळेल भाजप नेते संजू परब यांनी काळे यांना दिला शब्द.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, उपाध्यक्ष संदीप होळकर, भटके विमुक्त जाती व जमाती कृती समितीचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, आंबोली मंडल अध्यक्ष भरत गोरे, शेळके,दिपक पाटील आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स