बांद्यात सुजाता फोटो स्टुडिओची माकडाकडून नासधूस...!
अजित दळवी यांचे सुमारे ७० हजारांचे नुकसान…
बांदा राकेश परब :
बांदा शहरात पुन्हा माकडांनी उच्छाद मांडला आहे. कट्टा कॉर्नर येथील अजित दळवी यांच्या मालकीचे सुजाता फोटो स्टुडिओतील सामानाची माकडाने मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. यामध्ये ग्लास,फोटो फ्रेम,प्रिंटर,काँम्युटर,माँनिटर,
इलेक्ट्रिकल वस्तू, फर्निचर, मिळून यात यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बांदा वनरक्षक डी.बी.शिंदे यांनी घटनास्थळी येत पहाणी केली. वनविभागाने माकडांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांन कडून मागणी होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)