मडूरा येथे पर्यावरण पूरक कापडी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...!
बांदा | राकेश परब :
मडुरा येथे पर्यावरण पूरक कापडी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिरात महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास मडूरा ग्रामपंचायत व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांचे मोफत घेण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच साक्षी तोरसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामसेवक शाहा,प्रशिक्षक प्रकाश पाटील सर, संजिवनी ग्रामसंघांचे सर्व पदाधिकारी ,घरमालक प्रकाश परब ,ग्रामस्थ,आणि महिला उपस्थित होते
तसेच प्रशिक्षण कालावधी यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह भोसले यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचलन व आभार प्रतिक्षा शेट्ये यांनी केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)