ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोवा -बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अधिष्ठाता डाॅ.शिवानंद बांदेकर यांच्याशी चर्चा....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोवा -बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अधिष्ठाता डाॅ.शिवानंद बांदेकर यांच्याशी चर्चा....!

प्रकाशन: 07 Jun 2022 02:47 PM
वाचन संख्या 86

बांदा | राकेश परब :
गोवा -बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना केल्यात. सहकारी बिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमानंद शेट, सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासह बांबोळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याबरोबर बैठक घेत आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आमदार आरोलकर यांनी रुग्णालयात स्वखर्चातून २४ तास जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आरोलकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्वागत होत असून बांदा सरपंच अक्रम खान आभार व्यक्त केले आहेत.

Article image


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधेला मर्यादा असल्याने येथील गंभीर स्थितीतील अनेक रुग्ण उपचारासाठी गोव्यात जातात. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हे येथील रुग्णांसाठी सोईस्कर ठरते. मात्र गेल्या काही दिवसात गोवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी किंवा रुग्णांना वेळेत खाट उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सरपंच अक्रम खान यांनी प्रत्यक्ष बांबोळी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी याबाबतची माहिती आमदार जीत आरोलकर यांना दिली. आमदार आरोलकर यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत याबाबतची सविस्तर माहिती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरोलकर यांनी धीर दिला.
रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ बैठक आयोजित करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साथरोग ग्रस्त रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालयात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वखर्चाने २४ तास जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय आरोलकर यांनी घेतला.
सिंधुदुर्ग व गोवा हे सख्खे शेजारी असून व्यापार, उद्योग बरोबरच रक्ताचे संबंध आहेत. त्यामुळे यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला याठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत. याठिकाणी सुविधा देण्यासाठी टाळाटाळ झाल्यास किंवा दखल न घेतल्यास सरपंच अक्रम खान यांच्या माध्यमातून आपल्याशी थेट संपर्कात साधण्याचे आवाहन आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना बांबोळी येथे उपचार घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतः रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर हे विशेष लक्ष देणार आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी बांबोळी रुग्णालय प्रशासनाला विशेष बैठक घेऊन सूचना दिल्याने जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले आहेत. आमदार आरोलकर यांच्या समयसूचकतेसाठी सरपंच अक्रम खान यांनी आभार व्यक्त केलेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स