<em>जिल्ह्यात वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण रेंजच्या बाहेर..!</em>
अजय शिंदे जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ..!
मालवण | सुयोग पंडित :
पंधरा मे पासुन सुरू होणार ,होणार अशा बातम्या येत असतानाच शिक्षक रोज मोबाईल वर पासवर्ड, लाॅग इन आय डी येईल यासाठी सतर्क असुनही जुन महीना उजाडे पर्यंत काही ट्रेनिंग चालु झाली नाही..
या सर्व सावळ्या गोंधळात येणार्या समस्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे ,सचिव विजय मयेकर यांनी निवेदनाद्वारे शिक्षण संस्था (डायट)च्या प्राचार्य श्रीमती तावशिकर मॅडम व जिल्हा शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्या निदर्शनास आणून दिल्या,या ाचे प्रमुख विकास गरड ,पुणे यांच्याशी संपर्क करुन ,निदर्शनास आणलेल्या रास्त मागण्या व समस्या मांडल्या जातील असे आश्वासन दिले.
जिल्हा शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनीही या प्रकरणी लक्ष घालून येणार्या समस्यांचे निवारण केले जाईल असे सांगितले..
दोन जुनला ट्रेनिंग सुरु झालं पण जिल्ह्यातील असंख्य शिक्षक बांधवांना आय डी , पासवर्ड न मिळाल्याने त्यांच्या मनात भिती निर्माण झाली.ज्या शिक्षक बांधवांना आय डी , पासवर्ड मिळाला त्यांना साईट ओपन होत नव्हती.
शासनाने प्रत्येक शिक्षकांकडून दोनहजार रुपये फी भरुन घेउन हे आयोजित केले आहे.राज्य भरातुन एकाच वेळी ९४ हजार शिक्षक हा कोर्स पूर्ण करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ,अति दुर्गम जिल्हा असल्याने नेट ची समस्या आवासुन समोर उभी असताना ,१३जुन पासुन नियमित शाळा सुरू होईल ,मग तीस जुन पर्यंत साठ तास कसे पुर्ण करावे हा ही मोठा प्रश्न शिक्षकांपुढे उभा आहे.
इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळांच्या शिक्षकांना मराठी मधुन ट्रेनिंग दिले जात असल्याने त्यांच्या समोर वेगळीच समस्या उभी आहे.या शाळांचा विचार करुन संबंधित शिक्षकांना इंग्रजी मधुन ट्रेनिंग द्यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या पुर्वी सुट्टी च्या कालावधी मध्ये घेण्यात येत असलेल्या ामध्ये शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन ज्ञानाची माहिती देणे, शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रमाणपत्र देणे या सुलभ प्रक्रियेचा अवलंब करुन ॴॅफलाईनच द्यावे अशी मागणी शिंदे व मयेकर यांनी केली आहे..
दि.०२ जून २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या प्रणालीमध्ये काही ार्थी यांना लॉगीन करण्यात अडचणी आल्याचे निदर्शनास आल्यानंतर इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या तर्फे सदर प्रणाली अद्ययावत करण्याची व Security Patch Update करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जगभर सदर प्रणाली बंद ठेवण्यात आली होती व सदर प्रक्रिया पूर्ण होऊन पोर्टल रात्रीपासून सुरळीत सुरु झाले आहे असे सांगण्यात आले.
ार्थींना कालावधीत आपल्या सोयीच्या वेळी ( कधीही , कुठूनही, कितीही वेळा) लॉगीन करून सदर पूर्ण करण्याची सुविधा असल्याने त्यांना पूर्ण करण्यात कोणतीही असुविधा येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
सोबत परिषदेतर्फे दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत दररोज सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत ऑनलाईन शंका समाधान व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .तसेच इतर कोणत्याही शंका व तक्रार नोंदविण्याची सुविधा https://training.scertmaha.ac.in
वर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध होणार आहे.असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परंतु ार्थींची होणारी गैरसोय दुर करुन वाढीव कालावधी वाढवून मिळावा,ॴॅफलाईन देण्यात यावे, इंग्रजी माध्यमाच्या ार्थींना इंग्रजी भाषेतुन द्यावे , विनामुल्य देउन भरलेली फी परत करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने देण्यात आले..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)