ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>आजगांव येथील कु. वैष्णवी प्रभू हीने पटकावला 'संगीत विशारद' हा किताब..!!</em>

<em>आजगांव येथील कु. वैष्णवी प्रभू हीने पटकावला 'संगीत विशारद' हा किताब..!!</em>

प्रकाशन: 05 Jun 2022 02:10 PM
वाचन संख्या 142

सावंतवाडीची सुकन्या कु. वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू हीने संगीत क्षेत्रातील मानाची ‘संगीत विशारद’ पदवी प्राप्त करत संगीत क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला..!!

सावंतवाडी । देवेंद्र गावडे
रविवार । दि. ५ जून २०२२

याविषयीचे सविस्तर वृत्त असे कि
संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम संचलित ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संगीत विद्यालयाची “संगीत विशारद” होण्याचा मान मिळवणारी कु. वैष्णवी प्रभू ही पहिली विद्यार्थीनी ठरली आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षेत ‘शास्त्रीय गायन’ विषयातून तिने हे सुयश संपादीत केले आहे.

कु. वैष्णवी प्रभू ही आजगांव सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अतिशय लहान वयात, म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी संगीत अलंकार सौ. वीणा दळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे पदवी मिळविली आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद तर आहेच पण ग्रामीण भागातील संगीत क्षेत्राची आवड असणा-या मुलांना अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.

कु. वैष्णवी ही सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे.

अतिशय कमी वयात तीने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्धल तीच्यावर शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वच स्तरांमधून तीचं कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स