<em>संजय गांधी निराधार अनुदान रखडल्याने मालवणमध्ये भाजप आक्रमक…!</em>
तात्काळ अनुदान न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…..!
चिंदर | विवेक परब —
संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत तसेच श्रावण बाळ अनुदान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यापासून रखडले आहे. यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. शासनाने लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान प्राप्त करुन द्यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालवण तहसिल प्रशासनाला देण्यात आला आहे.
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने मालवण तहसिलदार कार्यालय येथील संजय गांधी योजना शाखा अधिकाऱ्यांची भेट घेत या बाबत निवेदन दिले यावेळी महेश मांजरेकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, दिपक पाटकर,भाऊ सामंत, बबलू राऊत, पूजा करलकर, प्रमोद करलकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)