<em>स्पंदन युथ फाउंडेशनच्या वतीने लखमराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!</em>
बांदा | राकेश परब :
सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवलेली अशी संस्था म्हणजे स्पंदन युथ फाउंडेशन यांच्या वतीने सावंतवाडी संस्थांनाचे युवराज लखमराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया युवराज लखम राजे यांनी दिली.
यावेळी युथ फाउंडेशन चे संस्थापक सिद्धेश महाजन, तेजस परब, केदार कणबर्गी, गोविंद प्रभू, अभिषेक देऊलकर, प्रशांत परब आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन युवराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)