ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघ आणि मतदार संघात समाविष्ठ होणारी गावे निश्चित..!

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघ आणि मतदार संघात समाविष्ठ होणारी गावे निश्चित..!

प्रकाशन: 02 Jun 2022 11:13 PM
वाचन संख्या 78

सिंधुदुर्ग जि.प.चे मतदार संघ आणखी ५ ने वाढले तर पंचायत समित्यांचे मतदार संघ १० ने वाढले

सिंधुनगरी | प्रतिनिधी :

जिल्हा परिषद निवडूकांची निवडणून प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. १० मे २०२२ च्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जि.प. व पं.स. मतदार संघ व त्या मतदार संघात समाविष्ठ होणार्‍या गावे निश्चित केली आहे. सिंधुदुर्ग जि.प. चे पूर्वीचे ५० मतदार संघ आणखी ५ ने वाढले आहेत. तर पंचायत समित्यांचे १०० मतदार संघ १० ने वाढले आहेत. त्यामुळे आगामी जि.प. व पं.स. निवडणूकीत जि.प. चे ५५ सदस्य व पं. स. चे ११० सदस्य कारभार पहाणार आहेत.
कोळपे, कोकिसरे, लोरे,
खारेपाटण, कासर्डे, नांदगाव, फोडा, हरकुळ बुद्रुक, नाटक, जाणवली, कलमठ, कळसुली,
विजयदुर्ग, पडेल, पोंबुर्ले, शिरगाव, नाडण कुणकेश्वर, कींजवडे, मिठबाव
आडवली माडली, आचरा, मसुरे मर्डे, सुकळवाड ,गोळवण, पेंडूर, वायरी भूतनाथ,
आब्रड, कडावल, कसाल, ओरस बुद्रुक, नेरूर तर्फ हवेली, तेंडोली, झाराप, तुळसुली तर्फे माणगाव, नेरूरकर्यात नारूर, माणगाव
म्हापण, आडेली, तुळस, मातोंड, उभादांडा, शिरोडा,
माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, ईन्सुली, मळेवाड, आरोंदा, बांदा,
मणेरी, साटेली भेडशी, माटणे असे ५५ जि. प. मतदार संघ निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी निश्चित केले आहेत. याबाबत नागरिकांच्या हरकती व सुचनांसाठी ८ जून पर्यंत मुदत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स