<em>रोटरी क्लब ऑफ बांदा आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीर..!</em>
बांदा | राकेश परब :
शुक्रवार दिनांक ०३ जून २०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्म्याचे वाटप शिबीर रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हीजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
वय वर्षे ४० च्या पुढील व्यक्तींची नेत्र तपासणी सदर प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे शुक्रवार दिनांक ०३ जून २०२२, वेळ सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत होणार आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)