ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..!

प्रकाशन: 31 May 2022 10:11 PM
वाचन संख्या 54

भाजप सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती..

वैभववाडी/विवेक मालवणकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती वैभववाडी तालुका भाजप कार्यालय येथे मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापूजन करून भाजप पदाधिकाऱ्यांनी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, याप्रसंगी भाजप जिल्हा महिला सरचिटणीस स्नेहलता चोरगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास थोडक्या शब्दात मांडला.

Article image

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती भालचंद्र साठे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर, स्वप्निल खानविलकर, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षा नेहा माईनकर उपनगराध्यक्ष संजय सावंत, आरोग्य शिक्षण संस्कृती सभापती रेवा बावदाने, बांधकाम सभापती विवेक रावराणे, महिला व बालकल्याण सभापती सुंदरी निकम, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका सौ वळवी, नगरसेवक राजन तांबे, नगरसेविका सौ संगीता चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, भारतीय जनता युवा मोर्चा वैभववाडी तालुका अध्यक्ष किशोर दळवी, खांबाळे शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, कोकिसरे शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप नारकर, शुभांगी पवार, भाजप कार्यालय संपर्कप्रमुख आनंद फोंडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स