ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रशासकीय अनावस्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उद्धवस्त याचं मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर-श्री विष्णू मोंडकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रशासकीय अनावस्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उद्धवस्त याचं मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर-श्री विष्णू मोंडकर.

प्रकाशन: 31 May 2022 10:37 PM
वाचन संख्या 62

चिंदर | विवेक परब :

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे सागरी पर्यटन जलक्रीडा व साहसी पर्यटनावर अवलंबून आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय उभारी घेत असताना २४ मे रोजी घडलेल्या बोट दुर्घटनेच्या घटनेचा आधार घेत जिल्ह्यातील सागरी पर्यटन पूर्ण पणे बंद ठेवण्याचा घाट स्थानिक प्रशासनाने घेतला आहे त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटनावर होऊन जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पूर्ण पणे ठप्प झाला आहे प्रशासनाने जलपर्यटन बंद करून पर्यटन व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. अश्या प्रशासकीय अनावस्थेमुळे स्थानिक भूमिपुत्रच्या माध्यमातून अनधिकृत व्यवसाय होतो वास्तविक जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक व प्रशासन यांची संयुक्तिक सभा होऊन जलपर्यटन चालू ठेवण्यासाठी काम होणे गरजेचे होते. इथल्या स्थानिक व्यावसायिकास या दिवसात व्यवसाय न मिळाल्यास येणाऱ्या दिवाळी पर्यंत पर्यकांची वाट पाहावी लागणार आहे. वास्तविक पाहता दर वर्षी २५ मे पावसाळी वातावरण गृहीत धरून शासनाच्या धोरणाप्रमाणे जलक्रीडा प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होतात परंतु स्थानिक किल्ला वाहतूक तसेच बॅकवॉटर ला समुद्र वातावरणाचां अंदाज घेऊन एक एक दिवसाची मुदतवाढ दिली जाते गेले २० वर्षे अशा प्रकारे परवानगी मिळते या वाढीव १० ते १५ दिवसाच्या पर्यटन हंगामावर जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांबरोबर, मासेमारी व शेतकरी व्यावसायिकांना देखील फायदा होतो शेवटच्या पर्यटन हंगामामुळे मच्छिमारांना मासेविक्रीतून जास्त नफा मिळतो तसेच आंबे, करवंद, जांभूळ, फणस यांच्या पर्यटकांनी केलेल्या थेट खरेदीतून जास्त नफा शेतकरी वर्गास मिळत असतो गेले दोन वर्ष कोरोनामुळे उद्धवस्त झालेला व्यावसायिक,स्थानिक प्रशासनाचे घरपट्टी, व्यावसायिक कर, व्यावसायिक दराने लाईटबील, बँक हप्ते अन्य खर्चातून मेटाकुटीला आला असून या उर्वरित पर्यटन हंगामातून होणाऱ्या नफ्यातून गेल्या दोन वर्षात झालेल्या कर्जातून मुक्त होण्याची आशा जिल्ह्यातील व्यावसायिकांस होती ती प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे उद्धवस्त झाली आहे. पर्यटनासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी सागरी पर्यटनासाठी तसेच जलक्रीडेसाठी गोवा येथे जाण्यास पसंती दाखवली असून जिल्ह्यातील पर्यटक आपली बुकींग रद्द करून गोवा राज्यात जाऊन जलपर्यटन करत आहेत स्थानिक जिल्हाधिकारी तसेच महाविकास आघाडीच्या पालकमंत्रानी तसेच नेत्यांनी या विषयी त्वरित लक्ष देऊन बंद पडलेले जलपर्यटन पावसाळी हंगामा पर्यंत चालू करावे अशी विनंती श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी स्थानिक प्रशासनास तसेच राज्य सरकारला केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स