ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>बांदा खेमराजच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पन्नास वर्षानंतर स्नेहमेळावा…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>बांदा खेमराजच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पन्नास वर्षानंतर स्नेहमेळावा…!</em>

प्रकाशन: 31 May 2022 10:01 PM
वाचन संख्या 34

बांदा | राकेश परब :

       १९७२-७३ वर्षाच्या अकरावी एस. एस. सी. वर्गाच्या विद्यार्थ्यांचा रविवारी २९ मे रोजी खेमराज हायस्कुलच्या प्रांगणातच स्नेह-मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. सुरवातीलाच चहा-पोहा हा पारंपारिक अल्पोपहार कार्यक्रम झाला. ह्या वेळेस प्रत्येक जण एकमेकांना अनोळख्या नजरेने न्याहळत होते. पन्नास वर्षापूर्वीच्या चेहरामोहरात आमूलाग्र बदल झाला होता. सकाळी बरोबर दहा वाजता कार्यक्रमाचे मुख्य अतिथि , त्यावेळचे विद्यार्थी-प्रिय शिक्षक तसेच हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक;मोहन देसाई यांचे आगमन झाले. त्याना घेऊन शाळेचे आताचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर आले होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुरवातीला संजय पावसकर यानी प्रास्ताविक करुन सर्वांचे स्वागत केले. दिवंगत विद्यार्थी स्वर्गवासी मुरारी पडते, भानुदास काणेकर, रघुवीर सातोस्कर, आनंद सावंत मोर्ये, वसंत परब, राघोबा चिंदरकर, ज्योत्स्ना मेस्त्री, सरोजिनी भिसे, उर्मिला पावसकर, सुमन सावंत, बंड्या जोशी, दिलीप आळवे, शेखर गोवेकर, विलास धामापुरकर, चांदसाब मुजावर, अजित कुबडे, विनोद शिरोडकर रवी शिर्के या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नंतर विद्यार्थीनी सौ. निलम नाईक गवंडळकर हिने पुष्पगुच्छ देऊन देसाई सरांचे स्वागत केले. सौ.सौदामिनी बर्वे नेरुरकर हिने पावसकर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विद्यार्थी जयप्रकाश कुबडे यांनी देसाई सरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मुंबई पत्रकार संघातर्फे नुकताच श्री. देसाई सर यांना समाज भूषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पावसकर याने माजी विद्यार्थ्यांतर्फे देसाई सरांचे अभिनंदन आणि कौतुक केले.नंतर ओळख कार्यक्रम सुरु झाला. सूत्रसंचालक संजय पावसकर याने आपली ओळख करून कार्यक्रमाला सुरवात केली. प्रत्येकाने आपले नाव व सद्याच्या कौंटुबिक परिस्थिति बद्दल बोलताना जयप्रकाश कुबडे, बाबि वसकर, पुंडलिक बांदेकर, सुरेश सावंत, आबा धामापूरकर, दशरथ धुरी, चंद्रकांत तोरस्कर, पांडुरंग सावंत, भिकाजी जाधव, पांडुरंग तोरसकर, चंद्रकांत नार्वेकर, रमाकांत शेवडे, दिलिप नेरुरकर, शंकर मांजरेकर, सुर्यकांत दळवि, मदन कुंदेकर, लाडु केणी, सखाराम सावंत, श्रीधर कळंगुटकर, चंद्रकांत काळसेकर , शरद सावंत तसेच शैला नाटेकर ,पावसकर, निलम नाईक,गवंडळकर, शुभांगी गोवेकर ,कवळेकर, सौदामिनी बर्वे ,नेरूरकर व रंजना मेस्त्री यांनी आपआपली ओळख करुन दिली त्या मुळे कार्यक्रमात बरीच रंगत वाढली. देसाई सर प्रत्येकास दाद देत होते. शेवटीं शाळेचे मुख्याद्यापक श्री. पावसकर सर यानी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संजय पावसकर यानी केले. नंतर शाळेच्या आवारात फोटो सेशन झाले. दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर माजी विद्यार्थीनी भाग्यरेखा मिशाळ हिने आणलेला केक कापुन कार्यक्रमाची सांगता झाली १९७२-७३ वर्षाच्या विद्यार्थ्यांची आठवण म्हणुन शाळेसाठी स्टिल ऑफिस कपाट भेट म्हणुन देण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 271
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स