भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या माजी सभापती अंबाजी हुंबे यांची भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी घेतली भेट..!
भाजप मध्ये प्रवेश केल्याबद्दल केले पुष्पहार घालून स्वागत..
वैभववाडी | विवेक मालवणकर – वैभववाडी तालुक्यातील संयमी नेतृत्व सर्वांना हवेहवेसे वाटणारे वैभववाडी पंचायत समितीचे माजी सभापती कुर्ली गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच अशा विविध पदावर ती कार्यरत राहून समाजसेवा करणारे सर्वांचे लाडके अंबाजी हुंबे यांनी नुकताच भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर ती भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री नवलराज विजयसिंह काळे यांनी आज हुंबे यांची निवासस्थानी घेतली भेट. या भेटीदरम्यान भाजप प्रवेश केल्याबद्दल काळे यांनी हुंबे यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर ती चर्चा करण्यात आली. परंतु कोणत्या गोष्टीवर ती चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. अंबाजी हुंबे यांच्या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुक्यासहित जिल्ह्यातील भाजप भटके-विमुक्त आघाडीला मोठ्या प्रमाणात बळ मिळणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)