ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे बीचवर टेहळणी पथक नेमण्याचे आदेश स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकाच्या सहभागाशिवाय काय कामाचे? - विष्णु मोंडकर..</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे बीचवर टेहळणी पथक नेमण्याचे आदेश स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकाच्या सहभागाशिवाय काय कामाचे? - विष्णु मोंडकर..</em>

प्रकाशन: 28 May 2022 10:46 AM
वाचन संख्या 104

चिंदर | विवेक परब –

    सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सागरी क्रीडा व्यवसायावर लक्ष देण्यासाठी टेहाळणी पथक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ज्यामध्ये अनेक शासकीय खात्यांच्या अधिकारी वर्गाचा समावेश करण्यात आला आहे.परंतु यामध्ये सागरी पर्यंटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा, व्यक्तीचां समावेशच नसल्यामुळे या पथकांचा उद्धेशच सफल होणार नाही. हा निर्णय घेताना स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. जिल्ह्यातील साहसीक्रीडा पर्यटन प्रकारातील सुरक्षेची जबाबदारी कुठल्याही शासकीय यंत्रणेने आज पर्यंत पार पाडलेली नाही महाराष्ट्र मेटाईम बोर्डाच्या माध्यमातून शासनाने गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये शासकीय कर घेऊन त्याबदल्यात पर्यटक व या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सुरक्षेतेसाठी एकही रुपया प्रशासना मार्फत खर्च झालेला नाही वारंवार विनंती करूनही पर्यटन संस्थांच्या विनंती, अर्जांना केराची टोपली दाखविण्याचे काम सोडून कुठलेही काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर  किनारपट्टी भागात दरवर्षी  येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत जाऊन आज दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त पर्यटक  स्कुबा डायव्हिंग ,जलक्रीडा पर्यटनासाठी या भागास भेट देतात,गेल्या http://localhost/news/public/uploads/20 वर्षांत सागरी पर्यटनासाठी देशविदेशातील करोडो पर्यटकांनी भेट दिली त्यांना साहसी जलक्रीडा पर्यटन करण्याची यशस्वी जबाबदारी स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांनि आपल्या योग्य नियोजनाने व व्यावसायिक अंतर्गत उभारलेल्या लाईफगार्ड यंत्रणेद्वारे यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामुळेच 24 मे रोजी स्कुबा डायव्हिंग बोट अपघातामध्ये 18 लोकांना वाचविण्यात आले याउलट या दुर्घटनेमुळे  दोन दशकापेक्षा जास्त काळानंतर अचानक  जाग्या झालेल्या स्थनिक प्रशासनास खऱ्या अर्थाने पर्यटकांची सुरक्षेवर काम करायचे असल्यास जलक्रीडा संघटना ,जलक्रीडा व्यावसायिक यांची त्वरित मिटींग आयोजित करून या व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक लाईफगार्ड, वैद्यकीय सुविधा,रेस्क्यूटिम,सागरी प्रशिक्षण,एक खिडकीयंत्रणा ,व्यवसाय अधिकृत  करण्यासंदर्भात सहकार्य होणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने स्थानिक प्रशासनाची मदत पर्यटकांस व स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांना होणारी आहे याविषयी जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी अशी विनंती श्री विष्णु मोंडकर जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग वतीने करण्यात येत आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स