ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ येथे राज्यस्तरीय जिल्हा नाभिक मेळावा उत्साहात संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ येथे राज्यस्तरीय जिल्हा नाभिक मेळावा उत्साहात संपन्न..!

प्रकाशन: 28 May 2022 09:25 AM
वाचन संख्या 39

चिंदर |विवेक परब
नुकतीच कुडाळ येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनात महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नाभिक बांधवांचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान संघटनेचे राज्य संघटक विजय चव्हाण यांनी भूषविले. त्यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे, ओबीसी नेते नविनचंद्र बांदिवडेकर, दत्तात्रय चेचर, अरुण खराटे उपस्थित होते. त्याचप्रमाणे मंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, उपाध्यक्ष महादेव चव्हाण, सरचिटणीस पांडुरंग भवर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष सोलाने, युवक अध्यक्ष सुरेंद्र कावरे, सातारा जिल्हाध्यक्ष विजय सकपाळ, सातारा माजी उपाध्यक्ष भाऊ दळवी, मराठवाडा संघटक बळीराम वैद्य, युवराज शिंदे, अमरावती विभागीय अध्यक्ष अविनाश भुतेकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर, प्रदेश सरचिटणीस राजन पवार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, गोवा राज्याध्यक्ष सुरलेकर, सिंधुदुर्ग महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण हे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांचा सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कुडाळ तालुकाध्यक्ष आनंद पिंगुळकर, मोहन बांबार्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष किरण पवार, देवगड तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण, जिल्हा कमिटीतील रुपेश पिंगुळकर, नितेश पिंगुळकर, किशोर पिंगुळकर, चंद्रशेखर चव्हाण, सुभाष चव्हाण, कुडाळ महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विद्या चव्हाण, कणकवली कार्याध्यक्षा प्रिया चव्हाण, कणकवली महिला आघाडीच्या सचिव हेमांगी अणावकर, मालवण नाभिक संघटनेच्या विशाखा चव्हाण यांच्या शुभहस्ते पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय नेत्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन व संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचे उदघाटन झाले. कुडाळ महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विद्या चव्हाण, निर्मला वेतुरेकर, मानसी चव्हाण, सायली चव्हाण, उज्ज्वला चव्हाण, हर्षदा चव्हाण यांनी सुस्वर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सर्वांनी एक मिनिट स्तब्ध राहून देहावसान झालेल्या बांधवांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी जिल्ह्याच्या कामांचा उल्लेख करीत प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचा, मेळाव्याचा उद्देश कथन केला. बारा बलुतेदार व एसबीसी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय चेचर यांनी नाभिक बांधवांना परिवर्तनासाठी हाक दिली. ओबीसी आणि व्हीजे एन टी राज्य संघटनेचे सदस्य व ओबीसी राज्य नेते नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यात नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी अर्ज भरुन देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कल्याणराव दळे यांनी सिंधुदुर्ग नाभिक बांधवांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ” आपल्या नाभिक युवकांनी समाजामध्ये आपली प्रतिमा उंचावली पाहिजे. उच्चशिक्षित होऊन अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साध्या सलूनांचे ब्युटीपार्लर मध्ये रूपांतर करायला हवे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक आधुनिक बनायला हवे. आपल्या जातीचा सन्मान वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आज गरज आहे. विविध योजनांचा अभ्यास करुन त्यांचा आपल्या मायक्रो ओबीसींसाठी कसा वापर करता येईल यासाठी समाजामध्ये सजगता निर्माण करण्यासाठी असे मेळावे घेतले गेले पाहिजेत. महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री ओबीसी समाजाची होण्यासाठी नाभिक समाजाने सहकार्य करायला हवे. ” त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य संघटक विजय चव्हाण यांनी नाभिक बांधवांना एकत्र येऊन समस्या सोडवूयात असे आवाहन केले. कुडाळ तालुका संघटनेने आणि जिल्हा कमिटीने दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. सर्व तालुक्यांनी एकत्र येत मेळावा यशस्वी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
त्यावेळी सत्कार करताना श्रावणचे पत्रकार गणेश चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. भोजनानंतर विविध ठराव संमत करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. संघटनात्मक बाबींवर जाहीर चर्चा करण्यात आली. त्यात अनेक नाभिक बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व समस्यांची व प्रश्नांची उत्तरे राज्य नेत्यांची समर्पकपणे दिली. समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या एस. सी. आरक्षणाच्या बैठकीवर चर्चा करण्यात आली. जिवाजी महालेंच्या स्मारकाविषयी राज्यातील प्रमुखांशी चर्चा करुन जिवाजी महाले सृष्टी निर्माण झालीच पाहिजे या ठरावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. आर्थिक विकास महामंडळाबाबत पाठपुरावा सुरु असल्याबाबत सांगण्यात आले. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शासकीय जागेवर असलेल्या नाभिक व्यावसायिकांना कायमस्वरूपी पट्टा देणेसाठीही सरकारशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. महाज्योती याद्वारे ओबीसींना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली.
रोहिणी आयोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.समाजाला संपूर्ण न्याय मिळण्यासाठी या आयोगाची माहिती घेणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. शासकीय स्तरावर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात यावा, त्यांच्या स्मारकाची यथोचित बांधला त्यांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार सरकारमार्फत करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
नाभिक समाजातील थोर व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शासकीय स्तरावर साजऱ्या करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. तसेच बारा बलुतेदारांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विषयांवर चर्चा करुन भूमिका समजवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कणकवली तालुका सचिव प्रवीण कुबल आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर यांनी केले. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा सरचिटणीस सुधीर चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स