ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अभिलाषा शिंदे यांना उमेद अंतर्गत सन्मानचिन्ह प्रदान..

अभिलाषा शिंदे यांना उमेद अंतर्गत सन्मानचिन्ह प्रदान..

प्रकाशन: 27 May 2022 07:14 PM
वाचन संख्या 70

अभिलाषा शिंदे या कणकवली तालुका नाभिक महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा..!

चिंदर |विवेक परब–
कलमठ लांजेवाडीच्या अभिलाषा अनिल शिंदे ह्या उपक्रमशील आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आशा ग्रामसंघ कलमठ यांनी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिवनेरी प्रभाग संघ कलमठच्यावतीने सी. आर. पी. अभिलाषा अनिल शिंदे यांना सन्मानचिन्ह व आकर्षक सन्मानपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले.
अभिलाषा अनिल शिंदे ह्या कणकवली तालुका नाभिक महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा म्हणून समाजकार्य करतात. त्यांच्या यशाबद्दल कणकवली नाभिक संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे पती अनिल सहदेव शिंदे हे कणकवली नाभिक शहर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर व कणकवली तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा तेजस्विनी कुबल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स