नामदेव कावले इंग्लिश मीडियम स्कुलला प्रिंटर स्कॅनर मशीनची देणगी..
अवि परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य..!
चिंदर/विवेक परब-
आचरा येथील अग्रेसर असलेले नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कुलला आचरा पारवाडी येथील अवि परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे परब बंधूनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रिथ्यर्थ प्रिंटर स्कॅनर ऑल इन वन मशीन देणगी दाखल दिली यावेळी परब बंधूंचे जेष्ठ बंधुनी फीत कापून उद्घाटन केले.
यावेळी स्कुल कमिटी चेअरमन निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, परब कुटूंबीय सदस्य शांताराम परब, मधुकर परब, वैभव पाडावे, अवि परब, अरुणा परब, स्मिता पाडावे, कविता परब, पिंटो साळकर, पपी शिंदे, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस, मेस्त्री कर्मचारी उदय बापर्डेकर, गावकर उपस्थित होते.
यावेळी परब कुटुंबातील सदस्य शांताराम परब म्हणाले की माझे आचरा गावाशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आपल्या हातून जेवढे सहकार्य होईल तेवढे आपण केलेले आहे, आणि यापुढेही करत राहू. शाळेतील विध्यार्थी हे खेळामध्ये विविध स्तरावर चमकले पाहिजेत. त्यांचा मैदानी खेळाचा स्तर उंचावण्यासाठी लागणारी मदत सहकार्य आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी निश्चितपणे सक्षम होऊ शकतील. यावेळी परब कुटुंबियांचे आभार व्यक्त करताना निलेश सरजोशी म्हणाले की या कुटूंबाच्या सहकार्यामुळे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्यांनी दाखवलेले दातृत्व आमच्यासाठी बहुमोल आहे शाळेसाठी आवश्यक असणारा प्रिंटर झेरॉक्स मशिन देऊन त्यांनी नित्याची असणारी गरज दूर केली आहे. गावातील शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा बहुतेक विना अनुदानित आहेत अशावेळी काम करताना तारेवरची कसरत करावी लागते मात्र परब कुटुंबियांसारखे दाते उभे राहतात आणि शाळांना हातभार लावतात त्यामुळे मुलांना गावातच शिक्षण घेणे शक्य होत आहे. परब कुटुंबायांनी शाळेसाठी मशीन देऊन दाखवलेल्या दातृत्वाबद्दल स्कुल कमिटी चेअरमन निलेश सरजोशी यांनी आभार व्यक्त केले. तसेच दि आचरा पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, संजय पाडावे यांनीही परब कुटुंबाला शुभेच्छा देत आभार व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)