ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
"कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी या नदी पात्रातील गाळ त्वरीत काढण्याचे आदेश द्या"- संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी या नदी पात्रातील गाळ त्वरीत काढण्याचे आदेश द्या"- संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी..

प्रकाशन: 20 May 2022 08:59 PM
वाचन संख्या 36

कणकवली | बंटी राणे :
कणकवली तालुक्यात सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी परिसर तसेच खारेपाटण नदी पात्रातील पाणी NH-६६ हायवे वर येवुन पुर आला होता. यामुळे शेती, घरे, दुकाने, हॉटेल्स, वाहने, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे खूप नुकसान झाले होते. तसेच पुराचे पाणी वागदे येथे महामार्गावर ५ फुटापर्यंत शिरल्याने महामार्ग देखील खूप काळासाठी बंद होता. तसेच खारेपाटण येथे पूर आल्याने तेथील बाजारपेठ व आजूबाजूचा परिसर देखील पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाला होता.
या २०२१ सालच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे तसेच गेली कित्येक वर्षे या तीनही नद्यांमधील गाळ न काढल्याने या सर्व नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सदरचा गाळ त्वरीत न काढल्यास यावर्षी देखील अतिृष्टीमुळे पावसाचे पाणी नदीपात्राच्या बाहेर येऊन पूरस्थिती निर्माण होणारी आहे. पावसाळा जेमतेम १५ दिवसांवर आला आहे. काल देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.
संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी पात्रातील गाळ त्वरित काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी उद्यापासूनच गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स