ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक…!

प्रकाशन: 20 May 2022 08:32 PM
वाचन संख्या 61

कणकवली | बंटी राणे :

शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी येथे पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक झाला आहे. काही दिवसापूर्वी सदर जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यावर डांबर ऐवजी मातीने खड्डे भरून डागडुजी करण्यात आली होती. तीच डागडुजी आता लोकांची डोकेदुखी झाली आहे.

Article image

यासंदर्भात कणकवली पंचायत समितीत जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे मा.सुशांत दळवी ,अमोल सावंत, प्रशांत कुडतरकर, गुरू वंजारे आदी कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता श्री.महाले साहेब यांच्याशी फोनवर रस्त्याच्या परिस्थितीची माहिती दिली. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आपल्याकडून लवकरात लवकर तात्काळ रस्ता सुस्थितीत व्हावा अन्यथा शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीने तो साफ करावा लागेल असे सांगितले. तसेच शाखा अभियंता श्री.कडुलकर रावसाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी लगेच तातडीने रस्त्यावरील माती काढून रस्ता पूर्ववत सुस्थितीत करुन देण्याची ग्वाही दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स