ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>युवा वर्गासाठी सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव…</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>युवा वर्गासाठी सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव…</em>

प्रकाशन: 20 May 2022 08:26 PM
वाचन संख्या 28

दिनांक २१ मे २०२२ पासून ते २३ मे २०२२ साजरा होणारा महोत्सव..!

वैभववाडी | नवलराज काळे :
कोकणचे सुपुत्र असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्या दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. आपल्या जिल्ह्यातील युवावर्गाने वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला गवसणी घालावी यासाठी त्यांची तळमळ आहे. नोकरीचा ठसा इथल्या जीवनमानावर असल्याने उद्योग करताना योजना प्रस्ताव ते बँक फायनान्सपर्यंत अनेक अडचणी येतात. नेमके काय करायचे याची कल्पना जिल्ह्यातील युवाईला नसल्याची जाणीव राणेसाहेबांना असल्याने सातत्याने त्या दिशेने त्यांनी पाठपुरावा केला आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांना प्रबोधनाच्या कामगिरीवर नेमले आहे. दिनांक २१ मे २०२२ पासून ते २३ मे २०२२ पर्यंत कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर भाजपा कार्यालयासमोरच्या विशाल मंडपात होणारा हा महोत्सव त्यादृष्टीने फार महत्वाचा आहे. मनोरंजन नव्हे तर अर्थकारणातून आयुष्य बदलण्याची संधी जिल्ह्यातील तरुण वर्गाला त्यातून मिळणार आहे. यावेळी राजकारण बाजूला ठेवत प्रत्येकाने भेट दिलीच पाहीजे असा हा उपक्रम आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोकण भागातील उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे.
विविध कार्यशाळांमधून होतकरू तरुणांसाठी बँक लोन मेळावा, कोकणातील उद्योजकांना सरकारी कंपन्यांसोबत टायअप करण्याची संधी, एक्स्पोर्ट प्रमोशन, उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी व झेड कॅम्प, मार्केटिंग व सेल्समनशीप कार्यशाळा, नोंदणी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वयंरोजगाराचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात मिळणार आहे. थोडक्यात, भविष्यातील परिस्थितीचा वेध घेत नोकरीच्या मानसिकतेतून जिल्ह्यातील युवा वर्गाला बाहेर काढत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीचा हा उपक्रम आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स