ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीतील खचलेल्‍या उड्डाणपूल रस्त्याची डागडुजी

कणकवलीतील खचलेल्‍या उड्डाणपूल रस्त्याची डागडुजी

प्रकाशन: 21 Aug 2021 09:13 PM
वाचन संख्या 68

चाचणी झाल्‍यानंतर उड्डाणपुल पुन्हा बंद..!

कणकवली | उमेश परब :कणकवली शहरातील उड्डाणपूल रस्ता जुलै महिन्यातील अतिवृष्‍टीमध्ये खचला होता. या खचलेल्‍या भागाची डागडुजी केल्‍यांनतर आज उड्डाणपुलाची बंद असलेली लेन चाचणीसाठी खुली करण्यात आली. सुमारे दोन तास वाहने सोडल्‍यानंतर सायंकाळी उड्डाणपुलाची मुंबई ते गोवा जाणारी लेन पुन्हा बंद करण्यात आली. दरम्‍यान २५ ऑगस्टपासून नारारण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात येणार आहे. त्‍यावेळी बंद असलेली लेन पुन्हा सुरू केली जाणार असल्‍याची माहिती दिलीप बिल्‍डकॉनच्यावतीने देण्यात आली.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम पहिल्‍यापासूनच निकृष्‍ट दर्जाचे झाले होते. यात गेल्‍या वर्षी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला होता. त्‍यानंतर उड्डाणपुलाची भिंत देखील दोन वेळा कोसळली होती. त्‍यानंतर यंदा पुन्हा जुलै महिन्यातील अतिवृष्‍टी कालावधीत उड्डाणपुला रस्ता खचला. यामुळे गेले महिनाभर मुंबई ते गोवा जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. खचलेल्‍या रस्त्याची डागडुजी झाल्‍यानंतर आज दुपार नंतर दोन तास ही लेन वाहनांसाठी खुली करण्यात आली. यात चाचणी झाल्‍यानंतर सायंकाळी ही लेन पुन्हा बंद करण्यात आली. दरम्‍यान खचलेल्‍या लेनची पुन्हा एकदा वाहने सोडून चाचणी केली जाणार आहे. त्‍यानंतर २५ ऑगस्ट पासून ही लेन वाहतुकीसाठी पूवर्वत केली जाणार असल्‍याचे दिलीप बिल्‍डकॉनतर्फे सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स