ओसरगांव तलावकिनारी साजरी होणार नारळी पौर्णिमा..
ओसरगांव तलावाला नारळी पौर्णिमेला श्रीफळ करणार अर्पण
कणकवली | उमेश परब : नारळी पौर्णिमेदिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण केले जाते. तर पोलिसांच्या वतीने कुडाळमध्ये भंगसाळ नदी आणि जानवली नदीला श्रीफळ अर्पण केले जाते. त्याचप्रमाणे यावर्षीपासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या ओसरगाव तलावालाही उद्या 22 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीफळ अर्पण केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता ओसरगाव तलावाला ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी ४ वाजता श्रीफळ अर्पण करण्यात येणार असून त्याचवेळी ओसरगाव तलावकिनारी नारळ लढविण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ओसरगांव तलावाला समस्त ओसरगांव वासीयांच्यावतीने श्रीफळ अर्पण करण्यात येणार असून यावेळी होणाऱ्या नारळ लढविण्याच्या स्पर्धेला शौकिनांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओसरगांव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता बबली राणे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)