ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कालव्याचे पाणी इन्सुली मध्ये दाखल झाल्याने जलपूजन..!</em>

<em>कालव्याचे पाणी इन्सुली मध्ये दाखल झाल्याने जलपूजन..!</em>

प्रकाशन: 19 May 2022 04:48 PM
वाचन संख्या 163

बांदा | राकेश परब : सातत्याने गेली अनेक वर्षे इन्सुली ग्रामस्थांची पाण्याची असलेली मागणी अखेर आज पूर्ण झाली.तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी इन्सुली पर्यंत दाखल झाले. इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर व माजी पंचायत समिती सदस्य नारायण यांच्यासह मान्यवरांनी पगावाडी येथे जलपूजन केले. सुमारे http://localhost/news/public/uploads/20 वर्ष कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा आज पूर्णत्वास आली.
यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच नारायण राणे, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, विभाग प्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स,शाखाप्रमुख आपा आमडोसकर, सहदेव सावंत, बाळा सावंत, अक्षय नाईक, महादेव मुळीक, कुंदन सावंत, आनंद मुळीक, सहदेव मुळीक आदींनी कालव्याला पाणी आले त्या निमित्ताने जलपूजन केले.शिवसेना इन्सुलीच्या वतीने देखील जल पूजन करण्यात आले.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांचे पाणी आज येणार, उद्या येणार असे सांगितले जात होते. अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली. ओटवणे येथे कालव्याच्या लाईन मध्ये दगड होता त्यामुळे तो काढण्यासाठी ठेकेदार चाल ढकल करत होता.गेली दहा वर्षे ते काम रेंगाळत होते. त्यामुळे आंदोलने देखील झाली होती.
इन्सुली गावात कालव्याचे पाणी दाखल झाले त्यामुळे गावच्या वतीने सरपंच गजानन उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांनी स्वागत करत जलपूजन केले. तसेच ग्रामस्थांनी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स