ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>कालव्याचे पाणी इन्सुली मध्ये दाखल…!</em>

<em>कालव्याचे पाणी इन्सुली मध्ये दाखल…!</em>

प्रकाशन: 19 May 2022 04:42 PM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तिलारी कालव्याचे पाणी रविवारी सकळी इन्सुलीत दाखल झाले. भूसंपादन होऊन जवळ जवळ वीस वर्षे झाली असल्याने कालव्याला पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मोठी मागणी होती.इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी जानेवारी मध्ये दिवस रात्र असे तीन ते चार दिवस आंदोलन केले होते. त्यांच्या त्या लढ्याला यश आले.गेली दहा वर्षे रखडलेले काम नाटेकर यांच्या आंदोलनानंतर सुरु करण्यात आले. ते काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पाणी सोडण्यात आले.इन्सुलीत कालव्याचे पाणी दाखल झाल्या नंतर शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

       सुमारे वीस वर्षा पूर्वी तिलारीच्या कालव्या साठी भूसंपादन करण्यात आले होते.त्याच पद्धतीने कामही पूर्ण करण्यात आले.किरकोळ मोठी काम वगळता जवळ जवळ ऐंशी टक्के कामे पहिल्या दहा वर्ष्यात पूर्ण करण्यात आली. तर इन्सुली येथील कामे पूर्ण झाल्यानंतर तब्बल पाच ते सहा वर्षे ओटवणे येथील काम रखडलेले होते. पाणी ओटवणे पर्यंत यायचे मात्र तेथील काम अपूर्ण असल्याने इन्सुली पर्यत पाणी येत  नव्हतं. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांतून रोष व्यक्त करण्यात येत असे. तर आम्ही कवडीमोल दराने दिलेली जागा हि केवळ पाणी येणार या आशेने दिली असे सांगत.  तर इन्सुलीत पाणी येण्यासाठी सर्वच पक्षांनी विविध स्तरावर अनेक निवेदने देऊनही केवळ पावसाळ्याच्या तोंडावर कामे केली जात असत मात्र जानेवारी २०२२ मध्ये ग्रामपंचायत सदस्य  स्वागत नाटेकर यांनी तिलारी कार्यालय चराठा येथे  ओटवणे येथील काम सुरु पर्यत उठणार नाही असे तीन ते चार दिवस रात्र आंदोलन केलं.

    फक्त आंदोलन न करता त्यांनी आठवड्याला एकदा ओटवणे येथे जाऊन कामाची पाहणी केली.काम बंद झाल्यास तात्काळ तेथिल अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांना जाणीव करून देत असत. नाटेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज इन्सुलीत पाणी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत नाटेकर, तिलारी कार्यकारी अभियंता, उप अभियंता व  सहा  अभियंता यांचे जाहीर आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स