<em>वेंगुर्ले - बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ले हद्दीतील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवा अन्यथा वृक्षारोपण..!</em>
वेंगुर्ले भाजपाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा…
चिंदर | विवेक परब : बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ले तालुक्यातील मठ – बोवलेकरवाडी , आडेली – खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच खड्डे वाचवीण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या वर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा त्या ठीकाणी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दुचाकी व तिनचाकी रिक्षा चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे पावसाळ्यापुर्वी लवकरात लवकर सदर रस्त्याची डागडुजी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा भाजपा च्या वतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला.
यावेळी भाजपा चे प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता दामले, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व समीर नाईक, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)