ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेवतळ्यात चंडिका मांड रस्त्याच्या कामाला चालना…!

रेवतळ्यात चंडिका मांड रस्त्याच्या कामाला चालना…!

प्रकाशन: 18 May 2022 05:13 PM
वाचन संख्या 53

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याकडून पाहणी ; स्थानिक नागरिकांचे समाधान ..

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील रेवतळे येथील नंदू गवंडी घर ते चंडिका मांड रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी स्थानिकांतून करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामाला २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. या कामाला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेतले. या कामासाठी यतीन खोत यांनी पाठपुरावा केला. रेवतळ्यातील नागरिकांतून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामाबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले व नगरपरिषद प्रशासनाला धन्यवाद दिले.

या पाहणीवेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स