मसुरे चांदेरवाडी येथे आज ट्वेंटी-ट्वेंटी भजन बारीचे आयोजन.
मसुरे | प्रतिनिधी : नवतरुण मंडळ मसुरे चांदेरवाडी आयोजित मसुरे चांदेर येथील महापुरुष पारा कडील त्रैवार्षिक सत्यनारायण पूजा व श्री महा सती देवी मंदिराच्या वार्षिक होमाचे औचित्य साधून आज 17 मे रोजी रात्री दहा वाजता ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला आहे .लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ भरणी कुडाळचे बुवा विनोद कदम व पावणाई देवी प्रसादिक भजन मंडळ तोंडवळी कणकवलीचे बुवा संतोष मिराशी यांच्यामध्ये हा भजन बारी चा सामना होणार आहे तरी सर्व भजन रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नवतरुण मंडळ चांदेर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)