ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पशुधन पर्यवेक्षक उमेश पेंडुरकर यांना राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 17 May 2022 04:19 PM
वाचन संख्या 49

२० मे दिवशी पुणे येथे पुरस्कार होणार प्रदान.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन पर्यवेक्षक उमेश विठ्ठल पेंडुरकर यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत सर्वस्तरातून उमेश पेंडुरकर यांचे अभिनंदन होत आहे. जागतिक पशुवैद्यक दिन सन 16 करिता पशुसंवर्धन विभागातील गुणवंत पशुवैद्यककांना पुरस्कार प्रदान करणे अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या सं वर्गामध्ये गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराकरिता पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनांक २० मे २२ रोजी सकाळी अकरा वाजता माननीय शरद चंद्रजी पवार सभागृह जिल्हा परिषद पुणे येथे पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्र डॉक्टर धनंजय परकाळे यांनी उमेश पेंडुरकर यांना लेखी स्वरुपात दिले आहे. उमेश पेंडुरकर यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. या कामाची दखल पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन या पुरस्कारासाठी उमेश पेंडुरकर यांची निवड केली. याबाबत विविध राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषद मधील सर्व अधिकारी वर्ग, कृषी अधिकारी, सर्व सहकारी कर्मचारी यांनी उमेश पेंडुरकर यांचे अभिनंदन केले आहे..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स