कणकवली ब्रिज वरील दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू
कणकवली / उमेश परब : कणकवली शहरातील ब्रिज वरील रस्त्यास मागील महिन्यात तडे गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता हे तडे तात्पुरत्या स्वरूपात भरून ब्रिजवरील दुसऱ्या बाजूचीही वाहतूक शनिवारी सायंकाळी ५ नंतर सुरू करण्यात आली आहे
कणकवली शहरातील ओव्हर ब्रिज हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळेच मागील महिन्यात याब्रिजवरील रस्त्यात मोठे तडे जाऊन मोठ्या भेगा पडल्या होत्या त्यावेळी कणकवली कराणी हायवे ठेकेदार व बांधकाम विभागाच्या निदर्शनास हे निकृष्ट काम आणून दिल्यानंतर काही दिवसांसाठी हा ब्रिज वाहतुकीस बंद करून डागडुजी करण्यात आली पण ती डागडुजी देखील तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने अजूनही काही ठिकाणी या ब्रिजला तडे गेल्याचे दिसत आहे तरीदेखील हा ब्रिज वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे त्यामुळे हा ब्रिज वाहतुकीस योग्य आहे काय असा प्रश्न कणकवली करांना पडला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)