जबाबदारी ओळखा नाहीतर धडक द्यावी लागेल : आप्पा चव्हाण यांचा इशारा.
मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा चव्हाण यांचा माध्यम,प्रशासन व लोकप्रतिनिधींसह सर्वांना इशारा.
मालवण | सुयोग पंडित : मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एस टी स्टॅन्ड येथील एकंदर सर्व सोयी व परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक असून त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी,प्रशासकीय यंत्रणा किंवा बहुतांश पत्रकारही भाष्य करत नसल्याचा आरोप केला आहे. मातृत्व आधार फाऊंडेशनच्या डिजिटल सामाजिक मंचाच्या समूहातून त्यांनी ही संताप वजा खंत व्यक्त केली आहे.
कोरोनाची महामारी आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप या चक्रव्यूहातून मालवण एसटी स्टॅन्डवर सर्व सामान्य माणसांची आधारवड ठरलेली एसटी म्हणजेच लाडकी लालपरी मालवण आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागली खरी परंतु तिच्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मालवण एसटी स्टॅन्डवर शौचालयाचा वापर करतांना नाक बंद करून दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यावर आवाज उठवून संबंधितांना सूचना खरे गरजेचे वाटते…..
तरी निदान समूहातील लोकप्रतिनिधी, पत्रकार,अधिकारी व समाजातीलही सर्वांनीच या कामी पुढाकार घेऊन एसटी प्रवाशांना दुर्गंधी पासून सुटका करावी असे आवाहन केले आहे.
ही सर्व कामे सामान्य जनतेला अभिप्रेत असणारी मुलभूत कामे आहेत आहेत असा स्पष्टोच्चार त्यांनी केला आहे.
पैठणी, आणि क्रिकेटच्या स्पर्धा ,एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे महत्त्वाचे आहेतच परंतु त्याहीपेक्षा म जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे त्यावर कामाबद्दल आपण व मातृत्व आधार फाऊंडेशन आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाचा जनहित पहाण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो ही आलेली ही गंभीर व खेदाची बाब आहे व संबंधितांनी या बाबतीत वेळीच दखल घेतलीच पाहिजे असे आवाहनाचा आप्पा चव्हाण यांनी केले आहे.
तसे न झाल्यास मातृत्व आधार फाऊंडेशनच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाला सर्व सदस्यांसह शासकीय तंत्रनिकेतनसारखीच मालवण एसटी स्टॅन्डवर अचानक धडक द्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
मालवण मधील व इतरही ठिकाणी सर्वांनी आपापली सर्वांगीण जबाबदारी ओळखून काम करावे तरच कोणाला क्लेषदायक अनुभव येणार नाहीत असे त्यांनी प्रतिपादन केले.
एखाद्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी समाजातील इतर घटकांसोबत आपल्याच समूहातील सदस्यांना कडक शब्दांत जागे करायचा हा प्रयत्न सर्व सामाजिक प्रशंसनीय असल्याची प्रतिक्रिया अनेक समाज व डिजिटल समूह अभ्यासकांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)