<em>पिकुळे लाडाचे टेंब येथे नूतन सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे उद्घाटन..!</em>
बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिकुळे लाडाचे टेंब येथे नूतन सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.आपल्या कोकणच्या लाल मातीत अनेक कलाकार, साहित्यिक जन्माला आलेत. या मातीचा सुगंध, गुणधर्म असा आहे की अशा सर्वांनी या कोकणच नाव सर्वदूर पोहचविले आहे. समाजाचे मुख्य अंग असलेली कला प्रबोधन करणारी असावी, तसेच मनोरंजनामुळे मानसिक तणाव कमी होतो, अशा दशावतार कलेचा पिकुळेे गावाला फार मोठा वारसा आहे. ज्या कै .रामा रत्नु गवस यांच्याकड़े चांगले संस्कार होते. अशा संस्काराच्या आधारावर त्यांचे कुटुंबीय नूतन नाट्य मंडळाचा शुभारंभ करीत आहेत. ही बाब खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे, असे गौरवद्वार माजी प्रशासकिय अधिकारी मोहन गवस यांनी काढले.
यावेळी व्यासपिठावर भाजपा नेते राजेंद्र म्हापसेकर,माजी सिंधुदुर्ग बँक संचालक प्रकाश गवस, सरपंच दिक्षा महालकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, मुख्याध्यापिका स्नेहल गवस, संतोष घोगळेे, सदाशिव गवस, आर .एन .गवस , अॅड .सोनू गवस, अॅड. अनिल गवस, माजी सभापती दयानंद धाऊसकर, दशावतार समिती अध्यक्ष सुभाष लोंढे , शंकर जाधव, उदय पास्ते, लवू नाईक, लक्ष्मण गवस, विठ्ठल गवस, महादेव गवस , यशवंत गवस, अमित गवस नाट्य मंडळ मालक शत्रू गवस उपस्थित होते. श्री. गवस पुढे म्हणाले की, आमच्या या कोकणच्या लाल मातीत अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. अनेक कलाकारांनी आपले नाव साता समुद्रापार पोहचवले आहे. आणि याला पिकूळे गाव देखील अपवाद नाही आहे अशा महान गावात एक दशावतार कंपनी स्थापन व्हावी हेही या गावचे पुण्यच आहे.
पत्रकार तेजस देसाई , शंकर जाधव , गणपत डांगी , भूषण सावंत , प्रमोद गवस , गोविंद शिरसाट , समीर ठाकूर , दशावतार कलाकार मोहन गवस यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
पिकुळे गावाला सर्वच क्षेत्रात मोठा वारसा लाभला आहे आणि निसर्गाची देण पिकुळे गावाला लाभली आहे. दशावतारी कला जोपासण्याचे काम पिकुळे गावाने केले आहे. असे मत भाजपाचे जि.प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केले. सिद्धिविनायक दशावतार मंडळाचा पाया कै. रामा (दादा) गवस यांनी रचला आहे. ते एक हौशी कलाकार होते. ते प्रत्येक कार्यात पुढे असत. अशा या हौशी कलाकाराचे स्वप्न आज पूर्ण होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे मत जिल्हा बँक माजी संचालक प्रकाश गवस यांनी व्यक्त केले. अनेक मान्यवर व्यक्तींनी हे मंडळ कोकणची आणि आपल्या गावाचा दशावतार क्षेत्राचा वारसा पुढे नेत ही बाब खूपच कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. प्रेरणास्थान असलेले कै .रामा रत्नु गवस यांनी दशावतार क्षेत्राची फार आवड असल्याने सुरू केलेले हे मंडळ नव्याने रंगभूमिवर पदार्पण करीत आहेत, ही आनंददायी बाब आहेच. भवितव्यात या मंडळाचा उत्कर्ष होईल, अशा शुभेच्छा अनेकांनी दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस देसाई , प्रास्ताविक रत्नदीप गवस , आभार सुमित गवस यांनी मांडले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)