ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भगवान बुद्ध वंदना.

भगवान बुद्ध वंदना.

प्रकाशन: 16 May 2022 01:28 PM
वाचन संख्या 186

रचना : वैशाली पंडित,मालवण.

जगणे व्हावे सहज सुलभसे
नसो अमानुष मत्सर कलह
हाच होता तुझा गौतमा
प्रगल्भ ज्ञानी सूज्ञ आग्रह…

जनन मरण हे निसर्गाधीन
त्याचा व्हावा स्वीकार
भोग भोगणे अटळ तयाची
नसो कधीही तक्रार..

सखी सहचरी अशी समंजस
यशोधरा हे प्रतीक शांतीचे
संसाराचा त्याग पतीचा
नाही अडविले पाऊल त्याचे..

दांपत्याची अभिन्नता ही
दुर्मिळ जागृत करूणाभाव
धर्म असावा वर्तनबंधित
धर्मच व्हावा आपद् भाव..

बौद्ध तोचि जो जाणून घेतो
मनुष्यासह सर्व जीवांना
हेचि मिळावे वरदान आजला
तरीच सार्थ ही बुद्धवंदना..!

वैशाली पंडित (सहसंपादक, आपली सिंधुनगरी चॅनेल)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स