चौके येथे 16 मे रोजी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन...!
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चौके सम्यकनगर समाज मंदिर येथे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ०९.०० वाजता पंचशील ध्वजारोहन, सकाळी १०.०० वाजता बुध्दपूजा पाठ, सकाळी ११.०० वाजता महामानवास अभिवादन सभा, तसेच विद्यार्थी गुणगौरव सत्कार, दुपारी १.वाजता स्नेह भोजन , सायंकाळी ४.३० वाजता महा मानवाच्या प्रतिमेची मिरवणूक ,रात्रौ ०९.०० वाजता सदानंद म्हेतर निर्मित दयानंद म्हेतर कोल्हापूर दिग्दर्शित ‘माणूस’ प्रस्तुत हाक बाबांची….
जागर प्रबोधनाचा…बहारदार बुध्द-भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम.
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक
सहयोग बौध्द विकास मंडळ चौके मुंबई व ग्रामीण शाखा जागृती महिला मंडळ, भारतीय बौध्द महासभा यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)