ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेचे उद्घाटन..

मालवणात विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेचे उद्घाटन..

प्रकाशन: 14 May 2022 08:58 PM
वाचन संख्या 135

मालवण | प्रतिनिधी : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने मालवण येथील भंडारी हायस्कुलमध्ये आयोजित विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय टेबलटेनिसपटू व भारतीय संघाच्या महिला टेबल टेनिस प्रशिक्षक ममता प्रभू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.

Article image

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, नितीन तळेकर, दिपक जाधव, चंद्रकांत रेवंडकर, अनिल आचरेकर, अरूण भोगले उत्तम पाटील, राजू अंधारी, किशोर शिगले, मुकुंद काजरेकर, उल्हास पराडकर अनिल मुंडये, चंदू गिरकर, मोहन केरकर आदी व इतर उपस्थित होते.

भंडारी हायस्कूलच्या दहावीची १९७१-७२ च्या बॅच टेबल टेनिसचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन व १९७१- ७२ च्या बॅचने या दोन दिवसीय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मुले व मुली एकेरी- ११, १३, १५ व १७ वर्षाखालील गट, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी व पुरुष ६० वर्षावरील असे गट आहेत. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स