ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री छत्रपति शिवाजी विकास सेवा सो.लि.अरुळे चेअरमन पदी सूर्यकांत अनंत बोडके व व्हॉईस चेअरमन पदी अशोक आकाराम आंगवलकर यांची बिनविरोध निवड….!

श्री छत्रपति शिवाजी विकास सेवा सो.लि.अरुळे चेअरमन पदी सूर्यकांत अनंत बोडके व व्हॉईस चेअरमन पदी अशोक आकाराम आंगवलकर यांची बिनविरोध निवड….!

प्रकाशन: 14 May 2022 08:53 PM
वाचन संख्या 52

वैभववाडी |नवलराज काळे : श्री छत्रपति शिवाजी विकास सेवा सोसायटी लिमिटेड अरुळे चेअरमन पदी सूर्यकांत अनंत बोडके व व्हॉईस चेअरमन पदी अशोक आकाराम आंगवलकर यांची बिनविरोध निवड झाली. अरुळे,निमअरूळे,शिराळे, मगामवाडी या चार गावांची ही एक सोसायटी आहे. सूर्यकांत बोडके,अशोक आंगवलकर यांच्यासहित सुहास शांताराम जांभळे, विजय बाबाजी पाटील, विठठल बाबू शेळके, शामराम कानू शेळके प्रकाश गंगाराम पांचाळ, संजय चांदू कदम, महेश गणपत इस्वलकर, पाडूरंग दाजी रावराणे, रंजना वासूदेव वारीक, सुप्रीया उज्ज्वल नारकर, प्रकाश विठोबा भोवड यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन पदाच्या निवडणूकीचे कामकाज अधिकारी श्रीमती सुनिता भोगले यांनी पहिले या वेळी संचालक यांच्यासहित सचिव सुहास रावराणे उपस्थितीत होते. सर्व कमिटी सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स