चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळाच्या कार्यालयाचा 18 वा वर्धापन दिन सोहळा..!
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळाच्या कार्यालयाचा 18वा वर्धापन दिन सोहळा गावठणवाडी उन्नती मंडळ व मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 14 मे रोजी संपन्न होणार आहे. सकाळी 7ते 9 आकारी ब्राम्हण देव व मंडळाचे कार्यालय येथे अभिषेक,9ते 12 सत्यनारायण महापूजा आरती, तिर्थप्रसाद, 1 ते 3 महाप्रसाद,3 ते 7 करमणूकीचे कार्यक्रम व बक्षिस वितरण, 7 ते 8 स्थानिक मंडळाचे भजन, 8 ते 10 हितचिंतक, देणगीदार, मान्यवरांचा सत्कार सोहळा तसे रात्री 10 वाजता दशरथ राणे लिखित स्थानिक कलाकारांच्या प्रेरणेतून कौटुंबिक नाटक -“कहाणी रक्ताच्या नात्याची” सादर होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आहे आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)