ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवलीत होणार जन आशीर्वाद यात्रेचं जंगी स्वागत…!

कणकवलीत होणार जन आशीर्वाद यात्रेचं जंगी स्वागत…!

प्रकाशन: 21 Aug 2021 04:43 PM
वाचन संख्या 43

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची जय्यत तयारी

कणकवली | उमेश परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला १९ आॕगस्टला मुंबईहून सुरुवात झाली. ही यात्रा २५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी व शाही तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरातही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘भूतो ना भविष्य’ असे यात्रेचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. यात्रेच्या निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत असून हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत.

केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणे प्रथमच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यांच्या या दौऱ्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राणेंच्या स्वागतासाठी त्यांनी कंबर कसली आहे. ही यात्रा अविस्मरणीय ठरण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणेंच्या स्वागताच्या बॅनरनी जिल्ह्यात भाजपमय वातावरण तयार केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स