<em>रेल्वेच्या क्षेत्रिय प्रबंधकांनी घेतली ह्युमन राईटच्या निवेदनाची दखल….!</em>
चिंदर | विवेक परब : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन च्या वतीने 5 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर श्री. संदीप सावंत यांच्याकडे रेल्वेच्या डब्यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट नंबर 01वर पूर्वीच्या ठिकाणी लावण्या बाबत निवेदन दिले होते.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या निवेदनानुसार 09 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी कणकवली रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी रेल्वेच्या डब्यांची यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझव्हेसन चार्ट फलाट क्रमांक 1 वर पूर्वीच्या जागी लावण्यात आला व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यात आली. त्याबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने रत्नागिरी विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक( RRM) माननीय श्री रवींद्र आर. कांबळे साहेब यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
त्याचप्रमाणे कणकवली रेल्वे स्थानक हद्दीतील रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील व पावसाळ्यानंतर व्यवस्थित रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले.
सरकता जिना लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल, असेही आश्वासन RRM माननीय श्री. रवींद्र आर. कांबळे साहेब यांनी दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)