खानोली येथील सिद्धेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर बिनविरोध…!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत गाव विकास पॅनलने पॅनेल प्रमुख महेश प्रभुखानोलकर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले. विरोधकांचा पराभव करत १३ पैकी १२ जागा जिंकल्या.
तोच यशाचा प्रवाह त्यांनी कायम राखत चेअरमनपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड होऊन सुरु ठेवला. निवडणुक अधिकारी कावले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडी ह्या प्रत्येकी एकच फार्म भरल्यामुळे बिनविरोध झाल्या.
या निवडीच्या नंतर भाजपाच्या वतीने प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी चेअरमन प्रशांत खानोलकर व व्हा.चेअरमन सुभाष खानोलकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. तसेच खानोली गावच्या सरपंचा प्रणाली खानोलकर यांनीही गावाच्या वतीने दोहोंचा सत्कार केला.
यावेळी भाजपा जिल्हा का.का.सदस्य रामकृष्ण उर्फ बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, प्रभारी ज्ञानेश्वर काळजी, पॅनल प्रमुख महेश प्रभुखानोलकर, माजी चेअरमन मधुकर खाडे, माजी चेअरमन प्रसाद प्रभु, सिद्धेश्वर प्रभुखानोलकर, बुथप्रमुख बाळु खानोलकर, सुनील घाग, संजु प्रभु, रत्नाकर खानोलकर, संचालक– शामसुंदर मुननकर, विलास सावंत, नाना कोळेकर, निता कोळेकर, भाई खानोलकर! महेश कांबळी, विजय सातार्डेकर, संतोष खानोलकर, अनंत प्रभु, रत्नप्रभा खानोलकर, पोलिस पाटील धोंडु खानोलकर, सुनील सावंत तसेच खानोली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)