ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुसुर भाजपाची एक हाती सत्ता…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुसुर भाजपाची एक हाती सत्ता…!

प्रकाशन: 08 May 2022 03:06 PM
वाचन संख्या 55

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील निवडणुक.

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील कुसुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करत भाजपाने शत प्रतिशत यश मिळविले आहे.
10 पैकी 10 जागा भाजपाने आपल्याकडे राखल्या तर दोन जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध राखल्या आहेत. सोसायटीची निवडणूक शनिवारी पार पडली. दरम्यान दुपारी आमदार नितेश राणे यांनी केंद्राला भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

भाजपाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे कर्जदार गटातून पुंडलिक सहदेव साळुंखे, समाधान गणपत साळुंखे, रत्नोजी आत्माराम साळुंखे, मानसिंग दत्ताराम शिर्के, शिवाजी वसंत साळुंखे, सिताराम रामचंद्र पाटील, गजानन पुंडलिक साळुंखे, दाजी दत्ताराम पाटील, तर महिला प्रतिनिधी गटातून भक्ती विठोबा गाडे, समिधा समाधान साळुंखे यांचा समावेश आहे. तसेच भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये गजानन राजाराम नामये, रमण यशवंत यादव यांचा समावेश आहे.

ही निवडणूक भाजपा व शिवसेना पुरस्कृत पॅनेलमध्ये झाली. सेनेने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सेनेचे अनेक पदाधिकारी गावात तळ ठोकून बसले होते.

भाजपने ही निवडणूक आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मतदाना दिवशी आमदार नितेश राणे यांनी केंद्रावर भेट देत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, प्राची तावडे, सुनील भोगले, धाकू पाटील व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. निकाल जाहीर होताच सर्व विजयी उमेदवारांचे आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले.

वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रचारादरम्यान वारंवार बैठका घेतल्या होत्या. विजयानंतर गावातील भाजपा कार्यकर्ते व विजयी उमेदवार यांचे नासीर काझी, अरविंद रावराणे यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स