ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'सगळ्यांचो सहभाग ह्याच मालवणचा वैशिष्ट्य त्यामुळे येवकच होया ..मालवण आपला आसा…!'

'सगळ्यांचो सहभाग ह्याच मालवणचा वैशिष्ट्य त्यामुळे येवकच होया ..मालवण आपला आसा…!'

प्रकाशन: 07 May 2022 04:12 PM
वाचन संख्या 152

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून साकारणार्या दांडी पर्यटन महोत्सवासाठी नगरपरिषदेतर्फे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आणि सहकारी माजी नगरसेवकांचे मालवणवासियांसह सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दक्षिणेकडील नयनरम्य व जगप्रसिद्ध ‘दांडी बीच’ येथे 13, 14, 15 मे http://localhost/news/public/uploads/2022 दरम्यान तीन दिवस पर्यटन महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. हा महोत्सव मालवण नगर परिषदेतर्फे आयोजित केला गेले आहे.
तमाम मालवणवासियांच्या या घरच्या महोत्सवामध्ये प्रत्येक मालवणवासियाने स्वतःहून सहभाग घेऊन हा महोत्सव यशस्वी करावा असे विनम्र आवाहन व निमंत्रण मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

Article image

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या कालावधीत खरंतर दरवर्षी अशा प्रकारचा पर्यटन महोत्सव करण्याचा मानस होताच आणि तशी तरतूदही नगरपरिषद अर्थसंकल्पात दरवर्षी करण्यात आली होती. परंतु शतक महोत्सवाच्या कार्यक्रमा नंतर 2 वर्षे कोरोना महामारी मुळे अशा प्रकारे महोत्सव साजरा करता आला नव्हता.

Article image


यावर्षी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकार्यांचा नगरपरिषदेतील लोकसेवेचा कालावधी संपला आहे आणि नप वर प्रशासक नेमला गेला आहे तरी आमदार वैभवजी नाईक त्यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतर्फे खास मालवणवासियांच्या सामाजिक,सांस्कृतिक व एकात्मतेच्या आनंदासाठी, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सर्व मालवणवासियांना प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले आहे.

मालवण हे पर्यटन दृष्ट्या विकसित होणारे शहर आहे , आणि दरवर्षी पर्यटकाचा ओघ वाढतच आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अश्या प्रकारचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन वृद्धीसोबतच मालवण मध्ये व्यवसायाची वृद्धी पण होणारआहे. मालवण वासीयांना सुद्धा करमणुकीचे साधन उपलब्ध करून देणे हाही त्या मागचा उद्देश आहे असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.

या पर्यटन महोत्सवा निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कराव्यात तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यावा अशी त्यांनी नम्र विनंती केली आहे.
या पर्यटन महोत्सवा निमित्त 10 मे सायंकाळी 5 वाजता भरड दत्त मंदिर ते नगरपालिका अशी शोभा यात्रा आयोजित केली आहे. सर्व मालवण वासीयांनी यामध्ये सहभागी होऊन पर्यटन वाढीबाबत व सक्षमतेबाबत मालवणवासीय एकजूट दाखवून देतीलच असा आग्रहाचा विश्वास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी व्यक्त केला आहे.

दांडी येथे हा पर्यटन महोत्सव आयोजित केल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी म्हणजे समस्त ‘दांडीकरांनी’ या पर्यटन महोत्सवाला यशस्वी करण्याची जबाबदारी स्विकारली आहे त्याबद्दल यानिमित्त माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स