ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बिळवस ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा 9 मे रोजी…!

बिळवस ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा 9 मे रोजी…!

प्रकाशन: 07 May 2022 07:08 PM
वाचन संख्या 151

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक राहणार विशेष उपस्थित..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 9 मे रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे यावेळी उद्घाटक व प्रमुख उपस्थिती खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रजित नायर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विनायक ठाकूर गटविकास अधिकारी जयंत जाधव कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अमित आवटी, उपअभियंता सावर्डेकर, बिळवस सरपंच सौ पालव , ग्रामसेवक युगल प्रभुगांवकर ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सकाळी ८.३० वाजता गणेश पूजन, सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ, १०.३० वाजता मान्यवरांचे स्वागत, उपस्थितांचा व जमीन मालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम व मनोगत.

Article image


दुपारी १.३० वाजता महाप्रसाद दुपारी ३ वाजता सत्यनारायण पूजा, संध्याकाळी ६ वाजता आरती, तीर्थप्रसाद, ग्रामस्थांचे स्थानिक भजन, सायंकाळी ७ वाजता हळदीकुंकू समारंभ रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्री १०.३० वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक ग्रामपंचायत बिळवस यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स