आचरा येथील अग्रेसर असणारी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी नव्या जागेत..!
सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन..
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटीच्या शाखेचे वसंतराव नेवाळकर स्मृती सदन आचरा तिठा येथे स्थलांतर करण्यात आले. यावेळी नूतन वास्तूंचे अनावरण आचरा गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
आचरा गावच्या सरपंच प्रणया टेमकर यांनी लोकमान्य सोसायटीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्या निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करणयात आले होते
यावेळी आयोजित कार्यक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक माननीय श्री पंढरी परब, श्री देव रामेश्वर संस्थान चे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद प्रभु मिराशी, श्री रामेश्वर वैभवशाली पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्रीकांत सांबारी, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी चे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद सामंत, मुंबई कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब, राजू मिराशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र मोर्वेकर शाखा व्यवस्थापक, आचरा शाखा यांनी केले. तर लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री आनंद सामंत यांनी सावंतवाडी विभागाच्या कार्याचा आढावा घेऊन लोकमान्य तर्फे येणाऱ्या नवनवीन योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमास व सत्यनारायण पूजेचे उपस्थित राहून बऱ्याच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रश्मी केळुसकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)