ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात नगरपरिषदेतर्फे भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रॅबीज लसीकरण मोहीमेला आरंभ..!

मालवणात नगरपरिषदेतर्फे भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रॅबीज लसीकरण मोहीमेला आरंभ..!

प्रकाशन: 07 May 2022 01:39 PM
वाचन संख्या 194

सोसायटी फाॅर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेने घेतलेय कंत्राट..

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी नगरसेवक व बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मंदार केणी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सॅपच्या तज्ञांनी स्पष्ट केली संपूर्ण मोहीमेची प्रक्रिया..

मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदेतर्फे नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा असा भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व ॲन्टी रॅबीज लसीकरण मोहीमेचा प्रकल्प आज सुरु झाला.

Article image


कोल्हापूर येथील सॅप म्हणजे सोसायटी फाॅर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेने या कामाचे कंत्राट घेतलेले आहे.
गेली काही वर्षे विशेषकरुन कोरोना काळापासून लाॅकडाऊनमुळे मालवण वासियांना भटक्या श्वानांचा धोका वाढत चाललेला होता. या श्वानांची पिल्ले व हे श्वान वाहनाखाली चिडण्याच्या घटनाही वाढत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अनेक पशूप्रेमी व नागरीकांची भावना लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व अन्य सत्ताधारी माजी नगरसेवकांनी या प्रकल्पाचा अभ्यास केला.

Article image

विविध पशुवैद्यकीय तज्ञ डाॅक्टर,विविध पशूप्रेमी संस्था व तज्ञ आणि इतर पर्यावरण व सामाजिक तज्ञांशी सल्लामसलत करुन मालवण नगरपरिषदेने या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. यात कोल्हापूरच्या सोसायटी फाॅर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेला या कामाचे कंत्राट मंजूर झाले.

Article image

आज 34 भटक्या कुत्र्यांना पकडून या भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण मोहीम व ॲन्टी रॅबीज लसीकरण मोहीमेला आरंभ करण्यात आला.
या मध्ये मानवीय पद्धतीने कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रॅबिज रोप्रतिबंधक लसीकरणही केले जात आहे. आडारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र तथा डंपिंग ग्राउंड येथे हा प्रकल्प सुरु करण्यात आला.

Article image

या मोहीम प्रकल्पाच्या कामाच्या आरंभावेळी सॅपचे पशुवैद्यकीय तज्ञ डाॅक्टर राहुल बोंबटकर, डाॅ. जितेंद्र यादव,समन्वयक सचिन देऊडकर व सहकार्यांसोबत मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर,नरेश हुले,भाई कासवकर,उमेश मांजरेकर,प्रसाद आडवणकर,पराग खोत, पृथ्वीराज जोगी नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी वळंजु , माध्यमांचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी सॅपचे पशुवैद्यकीय तज्ञ डाॅक्टर राहुल बोंबटकर यांनी श्वानांच्या या संपूर्ण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नागरिकांसाठीचे व श्वानांच्या वेदनांवरील उपाय असलेले हे काम अत्यंत महत्वाचे काम असून नगरपरिषदेच्या मार्फत राबविल्या जाणार्या विकास कामातील एक महत्वाचे व दूरगामी पाऊल असल्याचे स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स